Ad will apear here
Next
केजे कॅम्पसमध्ये इन्फोसिसची भरती प्रक्रिया

पुणे : येवलेवाडी येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ या संस्थेमार्फत अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तीन हजारपेक्षा अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’ या अग्रणी कंपनीच्या वतीने केजे शिक्षणसंस्थेत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये देशभरातून तीन हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी लेखी व मौखिक परीक्षा दिली.

पुण्यासह महाराष्ट्र आणि विविध राज्यांतून हे उमेदवार आले होते. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कंप्युटर, ई अँड टीसी, आयटी आणि इतर शाखेतून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यातून निवडलेल्या तीन हजार अभियंत्यांची केजे शिक्षणसंस्थेच्या केंद्रावर लेखी आणि मौखिक परीक्षा घेण्यात आली. 

या वेळी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. विजय वाढई, प्रा. डॉ. प्रकाश डबीर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रमोद दस्तूरकर, प्रा. राहुल उंडेगावकर यांच्यासह इन्फोसिसचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कल्याण जाधव म्हणाले, ‘संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या अभियंत्यांना नोकरी मिळणार आहे. इन्फोसिससारख्या मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना अभियंत्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर, रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकाने केला पाहिजे. भारताला जागतिक महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी कुशल अभियंते व उद्योजक यांची नितांत गरज आहे.’ 

संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTZBM
Similar Posts
‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका’ पुणे : ‘कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा सल्ला पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला
कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार पुणे : येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ आणि ‘केजे इन्फ्रा’चे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘नवभारत इन्फ्रा कॉनक्लेव्ह अँड अवार्ड’ कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कल्याण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
‘ट्रिनिटी’च्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखांचे पॅकेज पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ७० लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे, तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा
केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा पुणे : ‘विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत ‘सावित्रीबाई फुले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language